पाहत रहा ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर,’ दर सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता, फक्त शेमारू मराठीबाणा वर.
शेमारू मराठीबाणाच्या ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर‘ या मालिकेमधील भामिनी या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रेखा बडे. पडद्यावर प्रतापच्या काकीची भूमिका कुशलतेने साकारत आहे, जी भूमिका त्यांचासाठी आईसारखीच आहे. तिची ऑन-स्क्रीन नकारात्मक भूमिका, भामिनी, रेखाच्या उलट आहे, तिच्या प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण स्वभावासाठी तिचे ऑफ-स्क्रीन कौतुक केले जाते.
मालिकेची मुख्य अभिनेत्री तन्वी किरण हिने रेखाच्या आनंदी स्वभावाबद्दल आणि सेटवर तिने आणलेल्या सकारात्मक वातावरणाबद्दल तिचे कौतुक केले आहे. विशेषतः तन्वीला रेखाचा दयाळूपणा फार आवडतो, जी बर्याचदा सगळ्यांसाठी स्वादिष्ट पदार्थ आणते, आणि ह्या अश्या काही छोट्या छोट्या गोष्टींनमुळे सेटवर आनंदमय वातावरण राहते.
रेखा बडे
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, मालिकेमध्ये मानसीची भूमिका साकारणाऱ्या तन्वी किरणने तिच्या ऑन-स्क्रीन सासूची भूमिका साकारणाऱ्या तिच्या सह-अभिनेत्री रेखा बडेबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. तन्वी म्हणाली, “घरापासून दूर काम करताना, माझे सहकलाकार माझ्यासाठी दुसऱ्या कुटुंबासारखे झाले आहेत आणि रेखा बडे यांच्यासोबत माझे एक सुंदर नाते तैयार झाले आहे.
शोमध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी, ती खरोखरच एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे . सुरुवातीला मी घरी बनवलेले जेवण मिस करायचे, पण आता, माझी सह-अभिनेत्री रेखा हिच्यामुळे ती तळमळ बंद झाली आहे. ती नेहमी आमच्यासाठी घरगुती जेवण आणते, चविष्ट लोणच्यापासून मासे, चिकन, पराठे, इडल्या आणि इतर अनेक प्रकारचे पदार्थ आणते. अश्याप्रकारे सेटवरील वातावरण आनंददायी बनवण्यासाठी ती आपले स्वतःचे प्रयत्न करते.”
सौ. प्रताप मानसी सुपेकर – शेमारू मराठीबाणा
रेखा बडे आपल्या उत्कृष्ट अभिनयाने भामिनीचे पात्र केवळ जिवंत करत नाही तर ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर‘ च्या सेटवर सकारात्मक आणि आनंददायी वातावरणही वाढवते. त्याचबरोबर आनंद आणि दयाळू स्वभावाचा प्रसार करण्याच्या तिच्या कौशल्यामुळे ती संपूर्ण कलाकार आणि क्रूमध्ये एक प्रिय व्यक्ती बनली आहे.